प्रतिनिधी नळदुर्ग

उस्मानाबाद : जिल्ह्यातील नळदुर्गच्या प्राचीन किल्ल्यातील नर-मादी धबधबा रविवारी सकाळपासून सुरू झाला आहे. पावसाळा संपत असतानाच शनिवारी रात्री नळदुर्ग परिसरात पावसाने हजेरी लावल्याने धबधबा सुरू झाला. धबधबा पाहण्यासाठी रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, तुळजापूर, नळदुर्ग शहराला पाणीपुरवठा करणारे बोरी धरण बुधवारीच भरल्याने या परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. या किल्ल्याची शोभा वाढविण्यासाठी युनिटी मल्टी कॉम कंपनीने अनेक ठिकाणी सुशोभीकरण केल्याने पर्यटकांना त्याचा आनंद घेता येत आहे अनेक पर्यटक या किल्ल्याचे सौंदर्य पाहून या कंपनीचे कौतुक केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *