आ.सुरेश धस यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मुख्याधिकारी नगराध्यक्ष रेखाताई जगदाळे व ठेकेदार त्यांच्यावर कारवाईची मागणी
प्रतिनिधी नळदुर्ग

उस्मानाबाद : नळदुर्ग नगरपरिषद चे नगराध्यक्षा रेखा जगदाळे यांच्या कारभाराची चौकशी करून नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासह इतर मागण्याचे पत्र आ.सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विधान परिषद सदस्य तथा उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी नळदुर्ग नगर पालिकेतील नगर सेवक नय्यर जाहगीरदार पत्रकार आयुब शेख व इतरांच्या प्राप्त तक्रारीनुसार नगरध्यक्शा जगदाळे यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करणे व शहरात नागरी सुविधा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केल्याने पालिकेचे राजकारण तापले आहे.

आ. धस यांनी पत्रात म्हंटले आहे की नागराध्यक्षा जगदाळे या मनमानी, लोकशाही विरोधी काम करीत आहेत,नगरध्यक्षा जगदाळे यांचे बंधू अशोक जगदाळे यांचे पालिका कारभारात हस्तक्षेप वाढल्याने विकास कामाना खीळ बसली आहे,यामुळे पालिकेची आर्थिक हानी होत आहे,शहर साफसफाई कामाची निविदा डिसेंबर २०२० ला संपूनही सदस्यांचा मागणीकडे दुर्लक्ष करीत असलेला १०% अधिकाराचा दुरुपयोग करून १००% अधिकाराचा उपयोग करीत सर्वसाधारण सभेत कामांची निविदा न आणता नगरध्यक्षा निविदा काढत आहेत व शहरात अर्धवट-रखडलेले व काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले असताना ठेकेदाराला जादा रक्कम अदा केली गेली आहे,पाणी पुरवठासाठी खरेदी केलेले विद्युत पंप हे निविदेतील नमूद क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचा बसविण्यात आला आहे,तसेच रहीम नगर, भवानी नगर भागात रस्ता अर्धवट असल्याने मोठी अडचन होत आहे,दूषित पाणी पुरवठा, अस्वछता अश्या एकनाअनेक समस्या नमूद करण्यात आले आहेत, या सर्व समस्या दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे.शहरवासियांचे लक्ष वेधले आहे.
शहराचा विकास न झाल्याने गावकरी खंत व्यक्त करत आहेत आता या पत्राची दखल घेऊन जिल्हाधिकारी काय कारवाई करतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे