सचिन बिद्री:उमरगा
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या माडज येथील कै.किसन चंद्रकांत माने याच्या कुटुंबियांना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी वैयक्तिक 5 लक्ष रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शुक्रवार दि.8 रोजी आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांनी माडज येथील माने कै.माने यांच्या घरी सांत्वनपर भेट देवून मदतीचा धनादेश मृताचे वडील चंद्रकांत माने यांच्याकडे सुपूर्द केला. मराठा आरक्षणासाठी मी सुरुवातीपासूनच पाठपुरावा करत आहे. पुढील काळातही मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी या लढ्यात मराठा समाज बांधवांच्या सोबत आहे. मराठा तरुणांनी धीर सोडू नये, संयम बाळगावा आपल्या कुटुंबियांचा विचार करावा. असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे नम्र आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी युवकांना केले आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, उपतालुकाप्रमुख नरेंद्र माने, विधानसभा संघटक शरद पवार, मधुकर माने, बळीराम गायकवाड, शरद माने, विजय माने, युवा सेना तालुका सचिव काका गायकवाड, रवी पाटील, रमेश माने, राजेंद्र माने, राम पाटील, बळीराम मारेकर, आर.डी. माने, राजाभाऊ कोळी, दाजीबा काळे, सोपान माने, ज्ञानोबा काळे, आदन पाटील, आदी नागरिक व मराठा समाज बांधव उपस्थित होते.