पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांची मोठी कारवाई….
धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील तीन सराईत गुन्हेगार यांना तडीपार केले.a
धाराशिव :
नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीत इसम नामे 1) रोहन दिलीप उर्फ राम शिंदे, वय 21 वर्षे, रा. भोईगल्ली नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव, 2) फयाज उर्फ फजित आलीफा बाबु मौजन, वय 19 वर्षे, रा. किल्लागेट, नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव, 3) कैलास शिवाजी साळुंके, वय 28 वर्षे,रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द नळदुर्ग पोलीस स्टेशनला शरीरा विरुध्द व मालमत्तेविरुध्द चे गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्हेगारांनी आपली गुन्हेगारी टोळी तयार करुन सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत माजवून गंभीर स्वरुपाचे गुन्हेगारी कृत्य करीत होते. त्यांचेवर वेळोवेळी कायदेशीर कारवाई करुनही त्यांचे गुन्हेगारी वर्तनात फरक पडला नाही त्यांचे गुन्हेगारी कृत्यास कायमस्वरुपी आळा घालण्यासाठी सदर टोळी विरुध्द म.पो.का. क 55 प्रमाणे हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव नळदुर्ग पोलीस स्टेशन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस लोखंडे यांचे मार्गदर्शना खाली सदरचा प्रस्ताव पोअं 138 एस. पी. कांबळे यांनी तयार करुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. निलेश वि. देशमुख यांचे मार्फतीने मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाचे अनुषगांने मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी सदर इसमांना दि. 10.10.2023 रोजी संपुर्ण धाराशिव जिल्ह्यातुन 03 महिन्याचे कालावधी करीता तडीपार करण्यात आले असल्या बाबतचे आदेश पारीत केलेले आहेत. सदरचा आदेश लागु झाल्यापासुन सदर चे इसमांनी वरील जिल्हा व तालुक्या मधुन तडीपार करण्यात आले आहे. सदर चे इसम हद्दपार करण्यात आलेल्या तालुक्यामध्ये कोणालाही दिसुन आले तर पोलीस स्टेशन, नळदुर्ग येथे संपर्क करण्याचे आवाहन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. लोंखडे यांनी केले आहे.
नळदुर्ग शहरामध्ये
गुन्हेगारीची टोळी तयार करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणखी काही बरेच जण आहेत. याचा तपास करून पोलीस यांच्यावर आता काय कारवाई करणार याकडे मात्र सर्वांचे नागरिकांचे लक्ष