सचिन बिद्री : धाराशिव
उमरगा शहरातील गोंधळवाडा येथील श्री क्षेत्र रेणुका देवीची पालखी-छबीना मिरवणूक पारंपरिक पद्धतीने ढोल, पोत व हलगीच्या ठेका धरत आराधी महिला व भक्त भाविकांच्या उपस्थित सोमवारी (दि २३) पहाटे उत्साहात काढण्यात आली.
शहरातील गोंधळीवाडा येथील श्री रेणुका देवीच्या मंदिरात गेल्या आठ दिवसापासून घटस्थापना आणि विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सोमवारी पहाटे पावणेपाच वाजता रेणुका देवी मंदिरापासून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी पहाटे श्री क्षेत्र रेणुकादेवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अरुण इगवे सत्नीक संध्या अरुण ईगवे यांच्या हस्ते श्री रेणुका देवींचे पूजन व आरती करण्यात आली त्यानंतर देवी मंदिरात घटाची विधिवत पूजन करून घट हलविण्यात आले.
मंदिराचे सचिव श्री संजय चव्हाण व सौ.मेघा संजय चव्हाण यांच्या हस्ते श्रीच्या पालखीचे पुजन व आरती रण्यात आली.गोंधळवाडा श्री क्षेत्र रेणुकादेवी मंदिरापासून पारंपरिक वाद्यासह संबळ, तुणतुणे, धनगरी ढोल, हलगी, तुतारी, बँडबाजा, ढोल-ताशा आदीं संगीतमय उत्साही वातावरणात छबिना व पालखी काढण्यात आली. पहाटेचे सुमारास फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. देवीच्या पालखीसमोर आराध्यांचा मेळा पोत घेऊन नाचत होता तर पाठीमागून डोक्यावर कलश व हातात आरतीचे ताट घेऊन महिला भाविकांच्या येण्यामुळे पालखी सोहळा दिमाखदार दिसत होता. श्री रेणुका देवीची छबिना आणि पालखी मिरवणूक गोंधळवाडा मार्गे हनुमान मंदिरापासुन ते राष्ट्रीय महामार्गावरून एस टी कॉलनी पुन्हां मंदिरापर्यंत उत्साहात काढण्यात आली. प्रत्येक घरासमोर सडा-रांगोळी काढून पालखीचे स्वागत करण्यात आले. पहाटेच्या वेळी मंदिरात कोहळ्याचा बळी पूजेचे मानकरी मंदिराचे पुजारी माधव पांचगे यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी (२२) रात्रभर रेणुका देवी मंदिरात आराधी गोंधळ जागर कार्यक्रम घेण्यात आला. पहाटे देवींचा छबीना निघतो तरी नागरीक देवींचा छबीना व पालखी पाहण्यास व पुजा करण्यासाठी मध्यरात्री पासुनच तयारी करीत असतात. श्री रेणुका देवी मंदीराच्या प्रतिवर्षी नियमाप्रमाने सुर्वोदयापुर्वी देवींची पालखी मंदिरात दाखल झाली. यावेळी भावीक महिला, नागरिक, युवकांनी उत्साहात छबीन्यात सहभागी झाले होते. श्री रेणुकादेवी मंदिर नवरात्र महोत्सव यशस्वी उत्साहात होण्यासाठी देवी मंडळ अध्यक्ष अरुण ईगवे, सचिव संजय चव्हाण, उपाध्यक्ष अविनाश साळुंके, कार्याध्यक्ष सुरेशराव उबाळे, कोषाध्यक्ष रामलिंग घोगरे, सहसचिव प्रल्हाद घोगरे, मंदिराचे पुजारी माधव पांचगे, समिती सल्लागार राजेंद्र साळुंके, विक्रम पाचंगे, अभय रेणके, किसनराव घोगरे, रुक्मण्णा चव्हाण, रमेश ईंगळे,सुनील चव्हाण,जालधंर ईगवे,दिलीप चव्हाण,गणेश गरुड, हरी पाचंगे, गोविंद घोगरे, लक्ष्मण गरुड,,राजु पांचगे, यासह जितेश पाचंगे, किरण शिंगनाथ, आकाश गायकवाड, अभिमन्यु आबाचने, किरण स्वामी, महेश एचमे,विष्णु पांचाळ, गणेश पांचगे,करण काळे, शाम काळे, आकाश उघडे, दिपक शिगनाथ, हरीश पांचगे,रोहित पांचगे,अनिल भालेराव, ओमकार गाडेकर, महेश सुर्यवंशी, शिवा सुरवसे, व्यंकट घोगरे, आदींनी परिश्रम घेतले.