वाळुज/ छत्रपती संभाजी नगर

सिडको वाळूज महानगरातील समस्यांकडे प्रशासन कानाडोळा करते आहे. त्रस्त नागरिकांनी सिडकोच्या मुख्य प्रशासक यांची गुरुवारी भेट घेत त्यांना विविध सुविधा पुरविण्यासाठी साकडे घातले.

सिडको वाळूज महानगरात बहुतांश मध्यमवर्गीय कामगार वास्तव्यास आहे. सिडको प्रशासनाकडून सेवाकराची सक्तीने वसुली केली जात असून, मूलभूत सुविधा पुरविण्यास टाळाटाळ केली जात आहे. या परिसरात समस्या निकाली काढण्यात याव्यात, यासाठी तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, शीतल गंगवाल, भगवान खेडकर, विजय शेळके आदींच्या शिष्टमंडळाने सिडकोचे मुख्य प्रशासक भुजंग गायकवाड यांची भेट घेऊन आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. नियमितपणे धूर फवारणी केली जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला , नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

मुख्य रस्त्यावरील पॅचवर्क व डांबरीकरणाचे काम करण्यात यावे, धुळे-सोलापूर महामार्गालगत नवीन ड्रेनेजलाइन , याच महामार्गावरून सिडको वाळूजमहानगर-२ मध्ये मुख्य रस्ता जोडणे , एलआयजी एमआयजी नाल्यावरील भिंतीची दुरुस्ती करणे मागण्या करण्यात आल्या.

प्रतिनिधी:-अनिकेत घोडके
NTV न्यूज मराठी,वाळूज छत्रपती संभाजी नगर.
मो.8484818400

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *