वाळुज/ छत्रपती संभाजीनगर
ड्यूटी संपल्यानंतर घरी जात असतांना टेम्पो दुचाकीचा अपघात होऊन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदार स्वप्नील महेंद्र औचारमल ( वय२५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि ८ रोजी रात्री ९:१५ वाजेच्या दरम्यान घडली.

स्वप्नील औचारमल रा बेगमपुरा छत्रपती संभाजीनगर हे डायल११२ या गाडीवर चालक आहे. आपली ड्यूटी संपल्यानंतर हेमीप्रमाणे दुचाकीवरून घरी जात असतांना छावणी येथील रेल्वे पुलाजवळ येताच समोरील टेम्पो अचानक थांबल्याने दुचाकीवर असलेल्या औचारमल यांची टेम्पोला जोरात धडक बसल्याने अपघात झाला या अपघातात औचारमल यांच्या डोक्यात हेलमेट असतांना जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. त्यांना सहायक पोलिस उपनिरीक्षक पेडवाड यांनी तात्काळ सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे.

स्वप्नील औचारमल हे अविवाहित असून २०१९ मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले होते, औचारमल यांचे वडील शहर पोलीस दलात असतांना मृत्यू झाला.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्यूज मराठी, वाळूज छत्रपती संभाजी नगर.
मो.8484818400