शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी पिकासाठी पाणीटंचाई जाणवत होती वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी आणि सिद्धेश्वर धरणामध्ये जेमतेम 65 टक्के पाणी उपलब्ध आहे या धरणातील पाण्याचे नियोजन करून रब्बी व उन्हाळी पिकांसाठी पाण्याचे आवर्तने मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी माननीय आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्याकडे आग्रही मागणी केली होती
त्या अनुषंगाने माननीय आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांनी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता यासंदर्भात जलसंपदा मंत्री यांनी कालवा समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली होती या बैठकीमध्ये रब्बी हंगामासाठी दोन आणि उन्हाळी हंगामासाठी दोन अशी पाण्याची आवर्तने ठरवण्यात आली होती परंतु माननीय आमदार राजू भैया नवघरे पाण्याच्या पाच आवर्तनासाठी आग्रही होते त्यावेळी त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून पाच आवर्तने मंजूर करून घेतली परंतु त्या पाच पाण्याच्या आवर्तनाचे वेळापत्रक हे पिकांसाठी उपयोगाचे नव्हते त्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत होता
दिनांक 21 11 2023 रोजी माननीय जनसंपदा मंत्री यांची माननीय आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांनी पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री बिराजदार साहेब यांच्या समवेत भेट घेतली या बैठकीमध्ये माननीय आमदार राजू भैया नवघरे यांनी पाण्याच्या आवर्तनाचे वेळापत्रक बदलविण्यासाठी माननीय जलसंपदा मंत्री यांच्याकडे आग्रह धरला त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अगोदर तयार करण्यात आलेले आवर्तन संदर्भातील वेळापत्रक हे बदलण्यात येऊन नवीन वेळापत्रक मंजूर करून घेतले ते पुढील प्रमाणे 1)पहिले पाण्याचे आवर्तन 1 डिसेंबर ते 28डिसेबर
2)दुसरे आवर्तन 20 जानेवारी ते 16 फ्रेबुवारी 2024
3) तिसरे आवर्तन एक मार्च ते 24 मार्च 2024
4) चौथे आवर्तन एक एप्रिल ते 24 एप्रिल 2024
5) पाचवे आवर्तन एक मे ते वीस मे 2024
माननीय आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे वसमत मतदार संघ
प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली 98 50 56 18 50