चार उच्च पातळी बंधाऱ्यासाठी प्रत्येकी दहा कोटींचा टोकन निधी
नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात मंजुरी….
वसमत पुर्णा नदीवरील १२०० कोटींचा प्रकल्प असलेले चार उच्च पातळी बंधारे प्रकल्पासंदर्भात नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार राजू नवघरे यांनी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून प्रत्येकी १० कोटीचा टोकन निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
वसमत विधानसभा मतदारसंघातील प्रामुख्याने चार उच्च पातळी बंधाऱ्याचे काम गेल्या 35 वर्षापासून प्रलंबित होते यामध्ये पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा ,पोटा उच्च पातळी बंधारा, जोडपरळी उच्च पातळी बंधारा, ममदापूर उच्च पातळी बंधारा यांचा समावेश आहे. पूर्णा नदीवरील उच्च बंधारा प्रकल्पासंदर्भात आमदार राजू नवघरे यांनी आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रकल्पाची मागणी लावून धरली आणि या प्रकल्पाच्या निधीला तत्वता मान्यता मिळवली होती.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये या निधीची तरतूद केली. सुमारे १२०० कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांशी प्रकल्पासाठी आमदार राजू नवघरे यांनी सतत पाठपुरावा करत त्यांनी या प्रकल्पासाठी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून प्रत्येक उच्च पातळी बंधारा करण्यासाठी दहा कोटी रुपयांचा टोकन निधी मंजूर करून घेतला. टोकन निधीची तरतूद झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
वसमत मतदार संघातील काही लोकांकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु मी शेतकरी पुत्र आणि शेतकरी हे माझे रक्ताचे असल्यामुळे अर्थमंत्री अजित दादा पवार हे असल्यामुळे त्यांच्याकडून या प्रकल्पासाठी निधी मंजूर करून घेता आला
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आलेल समाधान हेच माझं श्रेय आहे. आमदार राजू भैया नवघरे यांचा प्रतिपादन
प्रतिनिधी नंदु परदेशी वसमत हिंगोली 98 50 56 18 50