हिंगोली जिल्हा अंतर्गत कळमनुरी,औंढा(नागनाथ),हिंगोली, व वसमत तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी राजरोसपणे तर काही ठिकाणी चोरट्या मार्गाने अवैधरीत्या बनावट देशी-विदेशी दारू,गुटखा,रेती विक्री मोठ्या प्रमात चालु असुन ती कायमस्वरूपी बंद करण्यात यावी या मागणीचे निवेदन दि.१५ डिसेंबर शुक्रवार रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती एवम ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे.
हिंगोली जिल्हा अंतर्गत हिंगोली,कळमनुरी,वसमत व औंढा(नागनाथ) तालुक्यातील ग्रामिण भागात काही ठिकाणी राजरोस तर काही ठिकाणी चोरट्या मार्गाने अवैध बनावट देशी-विदेशी दारु,गुटखा,रेती व्यवसाय स्वरूपात चालवले जात आहेत.नागरीकांच्या माध्यमातून संबंधित पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रारी देऊन सुध्दा चालु असलेले अवैध धंदे कायमस्वरुपी बंद होत नाहीत अवैध धंदे चालकाविरोधात पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जाते परंतु अवैध धंदे मात्र बंद केल्या जात नाहीत ही अत्यंत गंभीर बाब आहे.परीणामी चालु असलेल्या जिल्ह्यात अवैध धंद्यामुळे चोरीचे प्रकार वाढत आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अवैध धंद्यामुळे बळ मिळत आहे.त्यामुळे चालु असलेले अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करुन योग्य ती कारवाई करावी ग्रामिण भागात गाव खेड्यात,वाडी तांड्यात मोठ्या प्रमाणात अवैध देशीय विदेशी दारु,गावठी दारु राजरोसपणे विक्री केली जात असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची वाहतुक करुन विक्री केल्या जात आहे याकडे महसुल विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे शासनाचा करोडो रूपयाचा महसुल बुडत आहे.तसेच महाराष्ट्रात गुटखाबंदी असतांना देखील इतर राज्यातुन मोठ्या प्रमाणात गुटखा येत आहे प्रत्येक गावात दुकान,पानटपरीवर गुटखा सहज मिळत आहे.अवैधधंदे चालका विरोधात विशेष मोहीम राबवुन भरारी पथक नेमुन योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात संबधीत गृह विभागाला सुचना द्याव्यात.अवैध देशी-विदेशी बनावट दारु बहुतांश गावामध्ये राजरोसपणे व्यवसाय स्वरुपात विक्री केल्या जात असल्याने शासनाला मिळणारा वार्षीक करोडो रुपयांच्या महसुलामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे.या अवैध दारु विक्रीमुळे खानावळाच्या नावावर सर्रासपणे दिवसरात्र विक्री केली जात आहे त्यांच्यावर मात्र कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसतात अशावर कडक कारवाई करुन त्यांच्या खानावळचा परवाना रद्द करुन संबधीत जागा मालकावर सुध्दा गुन्हा दाखल करावा आणि त्यांचे सर्व साहित्य जप्त करावे.जिल्हा अंतर्गत गावागावात होत असलेले अवैध देशी विदेशी बनावट दारू विक्री भरारी पथक नेमुन कायमस्वरूपी बंद करावी जेणेकरुन मद्यविक्री मधुन मिळणारा शासनाचा महसुल बुडणार नाही तसेच ग्रामिण भागातील महिलांना त्रास होणार नाही.कारण बहुतांश गावातुन महिला संबधीत पोलीस स्टेशनला अवैध दारु बंद करावी अशा प्रकारचे निवेदन देतात परंतु अवैध दारु बंद होत नाही तरी संबधीत उत्पादन शुल्क विभागाला निर्देश देऊन पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क यांच्या सहकार्यातुन अवैध देशी-विदेशी दारु कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला.यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष पंडीत तिडके,हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे,जिल्हा कार्याध्यक्ष रमेश कुटे,युवा जिल्हाध्यक्ष अनिल लोंढे,महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई थिटे,प्रभाकर भिसडे,रमेश साळवे,जावेद अन्सारी,बळीराम आप्पा बेद्रे सह कार्यकर्तै उपस्थित होते.