जामखेड : वेळ सायंकाळी पाऊणे आठची.. गुलाबी थंडीत ‘आमचा संकल्प विकसित भारत’ हा कार्यक्रम रंगात आलेला. त्याचवेळी आमदार प्रा.राम शिंदे हे भाषणास उठतात.भाषण सुरु होते तोच अजान सुरु झाल्याचे शब्द त्यांच्या कानी पडतात आणि त्याक्षणी आमदार शिंदे यांनी समयसूचकता दाखवत आपले भाषण थांबवले. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपले भाषण सुरु केले.आमदार प्रा.राम शिंदे यांनी पिंपरखेड गावात केलेल्या या सकारात्मक कृतीची उपस्थित नागरिक, कार्यकर्ते आणि अधिकारी वर्गात चर्चा सुरु होती. आमदार प्रा.राम शिंदे यांनी आजानच्या वेळी आपले भाषण थांबवल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघातील मुस्लिम समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी ‘आमचा संकल्प विकसित भारत’ या रथातून डिजीटल स्क्रिनद्वारे जनतेला माहिती दिली जाते. विविध शासकीय विभागांचे अधिकारी गावोगावी जाऊन सदरची माहिती देताना दिसत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार प्रा.राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरखेड येथे 16 डिसेंबर 2023 रोजी रात्री आठच्या सुमारास ‘आमचा संकल्प – विकसित भारत’ या रथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेला दिली. त्यानंतर उपस्थिती राजकीय पदाधिकाऱ्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांचेही भाषण झाले. भाषण सुरु असतानाच आमदार प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या एका सकारात्मक कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले.
जामखेड तालुक्यातील पिंपरखेड गावात ‘आमचा संकल्प विकसित भारत’ या कार्यक्रमात भाषण करताना जवळच्या मशिदीतून अजानचा आवाज आमदार प्रा राम शिंदे यांच्या कानी पडला. त्याच क्षणी आमदार प्रा.राम शिंदे यांनी आपले भाषण थांबवले. त्यांनी अचानक भाषण का थांबवले हे उपस्थितांना काही क्षण उमगले नाही. व्यासपीठावर काही कार्यकर्त्यांनी थोडीशी चुळबुळ केली. मात्र आमदार शिंदे यांनी त्यांना कुठलाच प्रतिसाद दिला नाही. उपस्थित जनसमुदाय शांत होता. कार्यक्रमस्थळी पिन ड्राॅप सायलेन्स माहोल तयार झाला अन् सर्वांच्याच कानावर अजानचे शब्द पडू लागले. त्यानंतर आमदार प्रा.राम शिंदे यांनी भाषण का थांबवले याचा सर्वांनाच उलगडा झाला.
अजान संपल्यानंतर आमदार प्रा राम शिंदे यांनी पुन्हा आपल्या भाषणास सुरूवात केली. तत्पुर्वी आमदार प्रा.राम शिंदे हे अजान संपेपर्यंत उभे होते. त्यानंतर आमदार शिंदे यांनी आपले भाषण सुरू करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुती सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली.
दरम्यान, आमदार प्रा.राम शिंदे यांनी पिंपरखेड गावात आपल्या भाषणादरम्यान अजान सुरू होताच आपले भाषण थांबून दाखवलेल्या सकारात्मक समयसुचकतेची चर्चा कार्यक्रम स्थळी रंगली होती. पिंपरखेड गावात आमदार शिंदे अजान सुरू असताना आपले भाषण थांबवले या सकारात्मक कृतीचे कर्जत-जामखेड मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे. मुस्लिम बांधवांमध्ये चांगला संदेश गेला आहे.