प्रतिनिधी नंदु परदेशी वसमत हिगोली -9850561850
देशातील तरूणांच्या बळावर देश महासत्ता वरील होण्याची स्वप्ने पाहत आहे.देशाचा आधार स्तंभ असलेला हा तरूण व्यसनाच्या विळख्यात न अडकता तो निकोप सशक्त सुदुढ असला पाहिजे असे मत प्रा. डांँ. रमेश शिंदे सरांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था रेवुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बळेगाव येथे आयोजित बहि.शाल व्याख्यानमाला कार्यक्रमात ते बोलत होते.
तसेच रेवुलगाव येथे आयोजित दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला या. प्रा. नितीन बावळे सरांची वक्ते म्हणून उपस्थिती लाभली गावचे सरपंच सौ. अर्चना गिरी यांची उपस्थिती लाभली. मुलांना योगा बद्दल सविस्तर माहिती देत आजच्या काळात उत्तम आरोग्यासाठी योगा आणि रोजचा सकसआहार आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
गिरी मँडम ने ही आपली भुमिका स्पष्ट केली. कार्यक्रमास गावकरी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश फेगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी फेगडे यांनी केले.