बाबुराव कदम होळीकरांच्या गळ्यात उमेदवारांची माळ पडणार का
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचा शिवसेना उमेदवार बदलण्याच्या युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून ऐनवेळी बाबुराव कदम होळीकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याचे विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाली आहे भाजप कार्यकर्त्यांनी हेमंत पाटील यांना मोठ्या प्रमाणात विरोध केल्याने आता पुढील लोकसभेसाठी उमेदवार बदलण्याची सूत्र वेगाने सुरू झाले आहे,पुढील दोन दिवसात याबाबत निर्णय होतील असे देखील सूत्राने सांगितले आहे
हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेला महायुतीतून सोडल्यानंतर भाजपातून नाराजीचे सूर उमटू लागले त्यानंतर विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजी अधिकच तीव्र झाली यासंदर्भात भाजपच्या रविवारी दिनांक 31 मार्च ला झालेल्या बैठकीत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी नकोच असा सुर आळवल्या गेल्या कमळ चालेल धनुष्यबाणही चालेल पण हेमंत पाटील नको असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले
कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मतदाराशी कुठला संपर्क ठेवल्या नसल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला त्यामुळे शिंदे सेनेवर उमेदवार बदलण्यासाठी मोठा दबाव देऊ लागला आहे त्यामुळे आता शिंदे सेनेकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरू झाले असून शिंदे सेनेकडून नांदेड जिल्हा प्रमुख बाबुराव कदम होळीकर यांचे नाव आघाडीवर आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात राजकीय घडामोडी चे चित्र स्पष्ट होईल असे कार्यकर्त्यांच्या कडून सांगण्यात आहे
प्रतिनिधी
महादेव हारण
सेनगाव हिंगोली