1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथे आंबेडकर प्रेस कॉन्सिल चे संस्थापक अध्यक्ष रावण धाबे यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली यावेळी आंबेडकर कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी तात्कालीन जिल्हा कार्याध्यक्ष पत्रकार रवी शिखरे यांची आंबेडकर कौन्सिलच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच मीडिया प्रमुख सुधाकर वाढवे यांची संघटनेच्या जिल्हा कार्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली या बैठकीत मध्ये तात्कालीन जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांची विभागीय मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी आंबेडकर कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष ॲड .रावण धाबे यांनी निवड झालेल्या अध्यक्ष रवी शिखरे, कार्याध्यक्ष सुधाकर वाढवे, विभागीय अध्यक्ष संतोष जाधव, यांचा आंबेडकर कौन्सिल संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करत आंबेडकर कौन्सिल संघटना वाढीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व पदाधिकारी यांनी विशेष योगदान द्यावे असे आवाहन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी कपिल इंगोले, प्रकाश वाडे ,गोविंद जाधव, यांच्यासह वाहन चालक संघटना चे काही पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.