मुनीर शेख. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन मार्फत दि ९/१/२०२४ ते ११/१/२०२४ रोजी पवन तलाव या ठिकाणी भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल , पोफळी , अलोरे हायस्कूल , युनायटेड इंग्लिश स्कूल , एस.पी .एम स्कूल, ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल , मेरी माता स्कूल , न्यू इंग्लिश स्कूल सती , इंग्लिश मिडीअम स्कूल , सती या आठ संघाचा सहभाग असणार असून सामने बाद पद्धतीने खेळवले जातील . या स्पर्धा १६ वर्षांखालील वयोगटाच्या असून १/१/२००७ नंतरचा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळू शकेल .स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि ९/१/२०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता तर बक्षीस वितरण ११/१/२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल .
या स्पर्धेमध्ये चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन मार्फत प्रथम तीन क्रमांक प्राप्त संघास भव्य शिल्ड व मेडल ,प्रत्येक सामन्यामधील सामनावीर खेळाडूला टी शर्ट , उत्कृष्ट फलंदाजास सिझन बॅट , उत्कृष्ट गोलंदाजास 12 सिझन बॉल , उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास शूज , मालिकाविरास सिझन स्पोर्ट्स कीट अशी भव्य स्वरूपाची बक्षीसे दिली जाणार आहेत .
ग्रामीण भागामधून दर्जेदार लेदर बॉल क्रिकेट खेळाडू निर्माण व्हावेत . व भविष्यामध्ये चिपळूण तालुक्यातून लेदर बॉल क्रिकेट खेळाडू भारतीय संघांमध्ये पोहचावा हा प्रमुख उद्देश चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन यांनी व्यकत केला . तरी या स्पर्धेचा आस्वाद तालुक्यामधील क्रिकेट प्रेमीनी घ्यावा असे आवाहन चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री दशरथशेठ दाभोळकर व पदाधिकारी श्री सचिन कुलकर्णी,सुयोग चव्हाण,विनित देवधर,उदय काणेकर,राजेशजी सुतार यांच्यामार्फत करण्यात आले आहे .
