परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक शाळा व शिशुविहार पोफळी मध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
ढोल ताशांच्या गजरात श्री गणरायाचे आगमन झाले.शाळेच्या झांजपथकाच्या ठेक्यावर इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी लेझिम खेळत तसेच झेंडे नाचवत आणखीनच शोभा वाढविली.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.महेंद्र कापडी सर यांच्या हस्ते श्री गणरायाची मूर्ती अत्यंत उत्साहाच्या वातावरणात स्थापन करण्यात आली.श्रींची आरती घेऊन सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाची तयारी शिशुविहारच्या शिक्षिका कदम मॅडम,वारे मॅडम व जाधव मॅडम यांनी केली होती.तसेच त्यांनी आकर्षक सुशोभीकरण व विद्युत रोषणाई केली होती.
या कार्यक्रमासाठी प्राथमिक तसेच शिशुविहारच्या सर्वच शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *