परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित प्राथमिक शाळा पोफळी मध्ये श्रावण महिन्यातील येणारा पहिलाच सण म्हणजे नागपंचमी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.
या सणानिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची नाग बनविणे ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या नागांच्या प्रतिकृतींचे पूजनही यावेळी करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.महेंद्र कापडी सर यांनी यानिमित्ताने सापांविषयी माहिती सांगितली.प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका शिवानी शिंदे मॅडम यांनी नागपंचमी या सणाविषयी माहिती सांगितली तसेच श्री. अशोक मिसाळ सर यांनी पीपीटी च्या माध्यमातून तसेच यूट्यूबच्या द्वारे विद्यार्थ्यांना सापांविषयी माहिती दाखविली. शिक्षिका प्रतिभा धुमाळ ,साधना गायकवाड व मनिषा नाईक व सेविका सरिता मानकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची तयारी केली.यावेळी नागदेवतेचे पूजन करून विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला.या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्या सौ.देशपांडे मॅडम व सौ. गुळवे मॅडम उपस्थित होत्या.सर्व उपस्थितांचे शिवानी शिंदे मॅडम यांनी आभार मानले.
आपल्या संस्कृतीची ओळख आणि *जपणूक व्हावी यासाठी शाळा विविध सण साजरे करते तसेच स्पर्धांचे आयोजन करते.
