‘चतुरंग प्रतिष्ठान’ तर्फे वर्षभरात वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम कोकण शाळांसाठी आयोजित केले जातात. त्यापैकीच एक असा विद्यार्थी – शिक्षक – पालक आणि संपूर्ण कोकण भागात मानाचा समजला जाणारा उपक्रम म्हणजे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार.
वर्ष २०२३ – २४ साठीच्या पुरस्कार निवडीसाठी शनिवार-रविवार दि. ६ – ७ जानेवारी रोजी ग्रुप इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी एकूण ५३ शाळांतील २०७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. युनायटेड इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. मुकुंद कानडे सर, झाराप येथील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर आणि डी.बी.जे. महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ. सोनाली खर्चे मॅडम या मान्यवरांच्या निवड समितीद्वारे ग्रुप इंटरव्ह्यू मधून सर्वोत्तम विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या वर्षीच्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे करण्यात आले आहे.
पुरस्कार प्राप्त विद्यार्थी – विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे :