
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर लातूर शहरातील विवेकानंद व गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून पत्त्यावर तिर्रट जुगार खेळणारे व खेळवणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली आहे.

1 फेब्रुवारी व 2 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाणे विवेकानंद चौक व गांधी चौक हद्दीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये,तसेच रूम मध्ये काही इसम पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहेत अशी माहिती मिळाली. त्यावरून परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी मळवटी गावात, लायक शेख यांचे शेतात तसेच कोल्हे नगर, लातूर येथील अजित देशमुख यांच्या घरात छापेमारी करून बेकायेशीररित्या पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आलेल्या एकूण 25 इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 6 लाख 8 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे विवेकानंद चौक व गांधी चौक मध्ये नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चा कलम 4, 5 ,12(अ) कायद्यान्वये प्रमाणे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शुजाऊदीन मैनोदीन बागवान, सुरज कमलाकर सुर्यवंशी, अरविंद सटवाजी धावारे, संतोष लक्ष्मण राऊत, अजहर शौकत शेख, पवन चंद्रकांत औरादे, शिवाजी संभाजी ठाबरे, महेश श्यामराव ढगे, संतोष ज्ञानोबा कुटवाडे, समद अख्तरअली सय्यद, अक्रम रशीदसाब शेख, युनूस युसुफसाब मोमीन, नसीर इब्राहीम कुरेशी, मुस्तकीम जाकीर कुरेशी, संकेत दुर्गनाथ पारसे, सतीश विश्वंभर मस्के, अतुल पंढरीनाथ कटके, विलास लक्ष्मण शिंदे, रोहीत शिवाजी श्रीमंगले, अविनाश लालासाहेब कांबळे, गोरोबा दगडु कांबळे, अहनद सत्तार पठाण, पंकज आनिल शिंदे, बबन कदम (फरार), अजित देशमुख (फरार) असे असून वरील आरोपी पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आलेले आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून 1 व 2 फेब्रुवारी रोजी सलग दोन दिवस अवैध धंद्यावर धाडी टाकण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे.
लातूर प्रतिनिधी :-मोमीन हारून, एन टीव्ही न्युज मराठी, लातूर
9850347529 / 9822699888