section and everything up until
* * @package Newsup */?> नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे भुमीपुजन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर दलाली करणाऱ्यांना नेत्याला मोठी चपराक बसली आहे. | Ntv News Marathi

प्रतिनिधी आयुब शेख

अनेक वर्षांपासून प्रलंबीत व न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे भुमीपुजन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

पर्यटकांच्या सोयी साठी नळदुर्ग – अक्कलकोट रस्यां नच्या सुधारणे करीता निधी मंजुर करण्यात आला होता, मात्र या रस्त्यावरील काही शेतकऱ्यांनी जमीनीच्या मावेजा वरुन या कामास विरोध केला होता. अनेक वर्षे हा विषय न्यायालयीन प्रकियेत अडकल्याने या रस्याुध वरील रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने परिसरातील शेतकरी विद्यार्थी प्रवास करणारे भावी भक्त तसेच ग्रामस्थांना व प्रवाशांना मोठा त्रास होत होता.

हा विषय मार्गी लावण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी अस्तीत्वातील रस्यायाच्या दुरुस्तीचा मार्ग सुचविला होता. अधिकची जागा व त्यांचा मोबदला हा विषय स्वतंत्र ठेवून अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या रस्त्याची उपलब्ध रुंदी कायम करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यास मा. उच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. त्या अनुषंगाने या रस्याातच्या दुरुस्ती साठी रुपये 4 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. या 10.80 किमी.लांबीच्या रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया पुर्ण करुन 7 मार्च ला कामाचा कार्यरंभ आदेश निर्गमीत करण्यात आला व आज आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते अनेक वर्षे प्रलंबीत राहिलेल्या या रस्या आच्या कामाचे भुमीपुजन करण्यात आले आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर दलाली करणाऱ्यांना नेत्यांना मोठी चपराक बसली आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सचिन पाटील, विलास राठोड नय्यरभाई जहागीरदार, उदय जगदाळे, सुशांत भूमकर, सिद्धू कोरे संजय बताले, मुदस्सर शेख, पद्माकर घोडके, संजय जाधव
प्रवीण पवार.,संयोजक., भारतीय जनता पार्टी., तांडा वस्ती संपर्क अभियान तुळजापूर व उमरगा लोहारा विधानसभा.
यांच्यासह गावातील किशोर धुमाळ, किशीर सुरवसे, प्रमोद सोमवंशी, दत्ता पाटील, उषाताई मिटकर, बाळासाहेब पवार, नेताजी माडजे, नेताजी वचने एस के गायकवाड, कल्याण बिराजदार, हरीश पाटील, रामसिंग परिहार तसेच प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *