- सर्वाधिक मतदान तुळजापूर विधानसभा क्षेत्रात
- 12 लक्ष 72 हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
- 81 पैकी 20 तृतीयपंथीयांनी केले मतदान
धाराशिव,दि.8(माध्यम कक्ष) उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले. या निवडणूकीच्या मतदानाची टक्केवारी 63.88 इतकी आहे. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
औसा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 56 हजार 479 पुरुष, 1 लक्ष 37 हजार 604 स्त्री व 3 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लक्ष 94 हजार 86 मतदार असून त्यापैकी 1 लक्ष 1 हजार 978 पुरुष, 87 हजार 536 स्त्री आणि एक तृतीयपंथी अशा एकूण 1 लक्ष 89 हजार 515 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुषांची मतदानाची टक्केवारी 65.17 टक्के, महिलांची 63.61 टक्के तर तृतीयपंथीयांची 33.33 टक्के अशी एकूण 64.44 टक्के इतकी आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघात 3 लक्ष 10 हजार 703 मतदार असून यामध्ये 1 लक्ष 64 हजार 500 पुरुष, 1 लक्ष 46 हजार 193 स्त्री आणि 10 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यापैकी 1 लक्ष 291 पुरुष, 87 हजार 56 स्त्री आणि 4 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 1 लक्ष 87 हजार 351 मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदारांची टक्केवारी 60.97, स्त्री मतदारांची 59.55 टक्के आणि तृतीय पंथीयांची टक्केवारी 40 टक्के असे एकूण टक्केवारी 60.30 टक्के आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले त्याची टक्केवारी 65.40 इतकी आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 98 हजार 517 पुरुष, 1 लक्ष 77 हजार 39 स्त्री आणि 6 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून काल झालेल्या निवडणूकीत 1 लक्ष 34 हजार 1 पुरुष, 1 लक्ष 11 हजार 625 स्त्री आणि एका तृतीयपंथीयाने अशा एकूण 2 लक्ष 45 हजार 627 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 67.50 टक्के पुरुष, 63.05 टक्के स्त्री व 16.67 टक्के तृतीयपंथी अशा एकूण 65.40 टक्के मतदारांनी मतदान केले.
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 92 हजार 957 पुरुष, 1 लक्ष 72 हजार 977 स्त्री व 17 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 65 हजार 951 मतदार आहेत. त्यापैकी 1 लक्ष 28 हजार 121 पुरुष, 1 लक्ष 5 हजार 985 स्त्री अशा 2 लक्ष 34 हजार 106 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 66.40 टक्के पुरुष, 61.27 टक्के स्त्री असे एकूण 63.97 टक्के मतदान झाले.
परंडा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 73 हजार 146 पुरुष, 1 लक्ष 52 हजार 13 स्त्री व 6 तृतीयपंथी मतदार असे एकूण 3 लक्ष 25 हजार 165 मतदार असून त्यापैकी 1 लक्ष 13 हजार 940 पुरुष, 92 हजार 673 स्त्री व 3 तृतीयपंथी असे एकूण 2 लक्ष 6 हजार 616 मतदारांनी मतदान केले. मतदानाची पुरुषांची टक्केवारी 65.81, स्त्री टक्केवारी 60.96 टक्के व 50 टक्के तृतीयपंथी अशी एकूण टक्केवारी 63.54 टक्के इतकी आहे.
बार्शी विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 66 हजार 497 पुरुष, 1 लक्ष 54 हजार 734 स्त्री व 39 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 3 लक्ष 21 हजार 270 मतदारांचा समावेश आहे. 7 मे रोजी 1 लक्ष 12 हजार 202 पुरुष, 97 हजार 541 स्त्री आणि 11 तृतीयपंथी अशा एकूण 2 लक्ष 9 हजार 754 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 67.39 टक्के पुरुष, 63.04 स्त्री व 28.21 तृतीयपंथी अशा एकूण 65.29 टक्के मतदारांनी मतदान केले.
येत्या 7 मे रोजी झालेल्या निवडणूकीसाठी 10 लक्ष 52 हजार 96 पुरुष, 9 लक्ष 40 हजार 560 स्त्री आणि 81 तृतीयपंथी असे एकूण 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांचा मतदार यादीत समावेश आहे. त्यापैकी 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री व 20 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा या निवडणूकीत हक्क बजावला. यामध्ये 65.63 टक्के पुरुष, 61.92 टक्के स्त्री व 24.69 टक्के तृतीयपंथी अशा एकूण 63.88 टक्के मतदारांनी मतदान केले.
उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक 31 उमेदवार या निवडणूक रिंगणात आहे. सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकीत 14 उमेदवार, सन 2014 च्या निवडणूकीत 27 उमेदवार, सन 2009 च्या निवडणूकीत 25 उमेदवार, सन 2004 मध्ये 8 उमेदवार, सन 1999 मध्ये 5 उमेदवार, सन 1998 मध्ये 7 उमेदवार, सन 1996 मध्ये 21 उमेदवार, सन 1991 मध्ये 17 उमेदवार, सन 1989 मध्ये 12 उमेदवार, सन 1984 मध्ये 6 उमेदवार, सन 1980 मध्ये 5 उमेदवार, सन 1977 मध्ये 3 उमेदवार, सन 1971 मध्ये 5 उमेदवार, सन 1967 मध्ये 3 उमेदवार, सन 1962 मध्ये 3 उमेदवार, सन 1957 मध्ये 2 उमेदवार, सन 1951-52 च्या सार्वत्रिक निवडणूकीत 2 उमेदवारांत लढत झाली.
येत्या 4 जून 2024 रोजी 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतमोजणी होणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील 31 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून सर्वांचे लक्ष 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.
***