गोळवाडी( वैजापूर) अकील काजी

♦️वैजापूर तालुक्यातील गोळवाडी गावातील युवा प्रगतशील शेतकरी, ज्ञानेश्वर प्रल्हाद पाटील पगार यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी आदर्श युवा प्रगतशील शेतकरी व ग्रामपंचायत केंद्र चालक म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.

९ फेब्रुवारी रोजी लासूर स्टेशन येथे पोलीस प्रशासन आणी राजकीय नेते मंडळी याच्या प्रमुख उपस्थितीत जैन मंगलकार्यालयात होणार पुरस्कार वितरण सोहळा.

ज्ञानेश्वर पाटील पगार यांनी शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत एक आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या शेतात ड्रिप सिंचन पद्धतीचा वापर केला जातो. शेततळ्यात पाणी साठवून ते
उन्हाळ्यात पाण्याच्या तुटवड्यात शेतातील पिकांसाठी पाणी वापरतात.

त्यांच्याकडे शेतीसाठी आवश्यक सर्व यंत्रसामग्री असून, ते इतर शेतकऱ्यांना सल्ला आणि साहित्याची मदतही करतात.
याशिवाय, ज्ञानेश्वर पाटील पगार गोळवाडी ग्रामपंचायतीत संगणक केंद्र चालक म्हणूनही काम करतात.
ग्रामपंचायतीच्या योजना आणि माहिती प्रत्येक घरोघरी पोहोचवून त्यांनी ग्रामस्थांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत.

त्यांच्या या दुहेरी कार्यामुळे ते पंचक्रोशीत एक आदर्श युवा शेतकरी म्हणून ओळखले जातात..

गोळवाडी ग्रामस्थांनी आणि गावाचे सरपंच भाऊसाहेब पाटील शिंदे, ग्रामसेवक सुनील जाधव साहेब, ग्रामपंचायत सदस्य यांनी ज्ञानेश्वर पाटील पगार यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या आहेत.

ज्ञानेश्वर पाटील पगार यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे…
त्यांच्या या दुहेरी योगदानामुळे
त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या आहे..