गंगापुर प्रतिनिधीः आमोल पारखे गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, टमाटा, फळबाग आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसान ग्रस्त भागांचे पंचनामे झालेले आहे त्यानुषंगाने शासनाच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे बाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याची कार्यवाही करण्याची मागणी आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. गंगापूर खुलताबाद मतदार संघात ऑक्टोबर २०२४ मध्ये सर्वत्र गारपीटी सह पाऊस

झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. होते सीताफळ, मोसंबी सह इतर फळबाग भाजीपाला, टमाटा पिके देखील नष्ट झाली होती. त्यामुळे शेतकरी अर्थीक संकटात सापडला असल्याने अतिवृष्टीसदृश्य पावसाने गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील मंडळातील पिक नुकसानीचे अंतिम अहवाल आपल्या कार्यालयास संबंधित तहसिल कार्यालयांनी पाठविलेले असल्याने मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना एस डी आर एफच्या निकषानुसार आवश्यक ती कार्यवाही करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *