पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत चितेगाव येथे ऑनलाइन चक्री जुगार चालणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

सविस्तर माहिती असे की दि.
17 फेब्रुवारी सोमवार रोजी चितेगाव येथे बेकायदेशीरपणे विनापरवाना संगणकावर पैसे लावून चक्री जुगार खेळणाऱ्या तीन जणांवर बिडकीन पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे .

त्यांच्या कडुन 1,38, 850 रुपयांचा मुद्देमाल रोख पंधरा हजार पाचशे रुपये एक लाख 23 हजार रुपये किमतीचे ऑनलाईन जुगारांचे साहित्य जप्त केले आहे
1 ) किशोर शाम जावळे व्य 23 वर्ष रा चितेगाव , 2 ) इब्रान इरफान कुरेशी वय 36 वर्ष रा चंपा चौक पिवळी कॉलनी रोशन गेट , 3) प्रवीण बबन पटेकर वय 25 वर्ष रा रमानगर चितेगाव या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून
सदर ची ही कारवाई बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक महेश घुगे, पोहेकॉ पवार ,पोकॉ माळी हे करीत आहे
NTV NEWS MARATHI
बिडकीन प्रतिनिधी आलिम शेख पैठण