DHARASHIV | भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आ. सुजितसिंह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरातील मिलाफ मित्र मंडळाच्यावतीने दि.21 फेब्रुवारी रोजी सामाजिक भावना जपत गरीब व गरजुवंत कुटुंबियांना अन्न, धान्य, किराणा किट वाटप करण्यात आले. व तसेच शहरातील बसस्थानकाजवळ ऊसाचा रस वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणुन भाजपाचे नेते तथा भाजपा लोहारा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, नगरपंचायतीच्या गटनेत्या सारिका प्रमोद बंगले, भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, मिलाफ मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादाभाई मुल्ला,

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, भाजपा लोहारा तालुका उपाध्यक्ष प्रविण चव्हाण, भाजपा लोहारा तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, भाजपा लोहारा तालुका उपाध्यक्ष बालासिंग बायस, सरपंच व्यंकट कागे (भोसगा), जब्बार मुल्ला, शरद पवार गट राष्टवादी कॉग्रेसचे नेते नवाज सय्यद, रामचंद्र गायकवाड (तावशी), श्रीमंत मनाळे, ग्रामपंचायत सदस्य महादेव मिसाळ (मार्डी), मुबारक जंगी, विजय लांडगे, फजलु सय्यद (मुरुम), लक्ष्मण शिंदे, अब्दुल मुल्ला, बिलाल मुल्ला, जलाल मुल्ला, मुजीब शेख, यांच्यासह मिलाफ मित्र मंडळाचे पदाधिकारी, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव प्रतिनिधी