गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापूर तालुक्यातील भिमनगर बाभुळगाव नांगरे येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात दिनांक २८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता जिवन सहारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या विद्यमाने
साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजीनगर तालुका ,
कन्नड, वैजापूर, गंगापूर या तालुक्यातील विविध क्षेत्रात सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्य करणाऱ्या चाळीस समाज सेवकांना समाज भूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या वेळी पुज्य.भदंत विधुर व भंते प्रज्ञाशिल पाणपोई कन्नड यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रा. डॉ.ऋषिकेश कांबळे जेष्ठ साहित्यीक, विचारवंत ,समीक्षक व प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक अनिल कांबळे, आयुष्यमती मीनाक्षी जाधव बार्टी पुणे यांच्या शुभहस्ते ४० समाज सेवकांना समाज भूषण जिवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या मध्ये गंगापूर शहर येथून आयु.लक्ष्मण माघाडे
यांनी सामाजिक,धार्मिक,भीम कवी, गायनातून समाज प्रबोधन,
एस. टी.महामंडळ मध्ये केलेल्या कार्याची व पत्रकारिते मधून अन्यायाविरुद्ध घेतलेल्या लेखणीची दखल घेऊन त्यांना समाज भूषण जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. या निवडी बद्दल नातेवाईक,
मित्रमंडळी व गंगापूर परिसरातील अनेकांनी प्रत्यक्ष भेटून व मोबाईल द्वारे शुभेच्छा देऊन व पुढील कार्यासाठी हार्दिक अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन बाबासाहेब जाधव व विनोद बागुल यांनी केले तर अध्यक्ष बाबासाहेब भिकाजी सोनवणे, सचिव प्रकाश दिवेकर, उपाध्यक्ष दादासाहेब त्रिभुवन, सल्लागार सुभाष थोरात, सह सल्लागार दारासिंग चाबुकस्वार यांनी सर्वांचे आभार मानले.
