पैठण तालुक्यातील काही दिवसापूर्वी हिरडपुरी मधे अवैध पने वाळू उपसा वाहन द्वारे करणारे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली होती

मात्र तेच वाहन सोडण्यासाठी
पैठण तहसिल कार्यालयातील काम करणारे खाजगी इसम सलीम शेख याने फिर्यादीकडे तहसिल कार्यालयात जप्त असलेले वाळू वाहतुकीची दोन वाहने सोडण्याकरीता स्वतः करीता व तहसिलदार चव्हाण यांचेकरीता 1,10,000 रुपयांची लाच मागणी करुन सदर लाच रक्कम सलीम शेख यांनी दि. ३ सोमवारी रोजी ३ च्या दरम्यान हिरडपुरी येथील फिर्यादीचे स्वप्निल सुरेश तांबे यांच्या गाळयाच्या बांधकामाच्या ठिकाणी घेतली असून लोकसेवक हरिष शिंदे यांनी दि. १८ रोजी फिर्यादीचे जप्त केलेल्या वाहनातील वाळु त्यांचे घरी टाकण्याचे सांगितल्याने त्यांनी फिर्यादीकडे वस्तुच्या स्वरूपात लाचेची मागणी केली असुन दि. २४ रोजी १२ ते २वजेच्या दरम्यान फिर्यादीकडे 30,000/-रुपये लाचेची मागणी केली होती तसेच तहसिलदार सारंग चव्हाण यांनी दि. 16 रोजी फिर्यादीचे वाहने सोडण्याबाबतचा प्रस्ताव वर सही करून प्रांत कार्यालयाकडे पाठविण्याकरीता सलीम शेख यांचे ताब्यात दिला होता मात्र दि. १८ रोजी पडताळणी कारवाई दरम्यान फिर्यादीने सलीम शेख यांना फोन केला असता त्यांनी ते तहसिलदार साहेबांच्या सोबत असल्याचे सांगितले व जेव्हा तहसिलदार साहेबांची शासकिय गाडी तहसिल कार्यालयात आली त्यावेळी सलील शेख हा तहसिलदार साहेबांच्या शासकिय गाडीतुनच खाली उतरला त्यानंतर सलीम शेख यांनी शिंदे यांचेकडुन फाईल घेवुन त्यावर सही आणन्यासाठी ते तहसीलदार श्री. चव्हाण साहेब यांचे काँबिनमध्ये गेले तहसीलदार यांनी सलील शेख हा खाजगी इसम असतांना त्यास शासकीय वाहनात बसुन तसेच कार्यालयातील काम करण्यास परवानगी देवुन अपप्रेरणा दिलेली आहे. तसेच लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर सलीम शेख यांचे वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात तहसिल कार्यालयातील तहसिलदार साहेबांच्या सहया असलेल्या महत्वाच्या कागदपत्रांच्या फाईल मिळुन आल्या. सलील यांचे मोबाईलमधील व्हॉट्सअँप चेक केले असता त्यामध्ये सलील याने कार्यालयीन पत्रव्यवहार तहसिलदार यांचे व्हॉट्सअँपवर पाठवुन तो बरोबर आहे का ते चेक करण्यास सांगितले असता त्यांनी बरोबर असल्याचे सांगितले आहे. यावरून तहसिलदार चव्हाण यांनी खाजगी इसम सलीम शेख यांस तहसिल कार्यालयातील सुविधा पुरवुन, फिर्यादीकडे लाचेची मागणी करण्यास व स्विकारण्यास अपप्रेरणा व प्रोत्साहन दिले असल्याचे दिसुन येत असल्यामुळे सदर आरोपीतां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरच्या येथून कारवाईसाठी आलेल्या एसीबीच्या पथकाकडून उशिरा रात्री बारा ते एक वाजेच्या दरम्यान महसूल विभागाच्या पैठण येथील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छत्रपती संभाजी नगर येथे घराची झडती घेऊन सुद्धा यात पथकाच्या हाथी काय लागले याची काही माहिती अद्यापही मिळालेली नाही

NTV NEWS MARATHI
बिडकीन प्रतिनिधी अलीम शेख छत्रपती संभाजी नगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *