(प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर )
काल दिनांक 14 अक्टूबर रोजी कल्मेस्वर येथिल एमआयडिसीचा भगीरत कंपनी व्यवस्थापन आणि भगीरथ कामगार संघटनेच्या नेतृत्वामध्ये, पुढील ४ वर्षांसाठीचा महत्त्वपूर्ण वेतन आणि सुविधा करार मंजूर झालेला आहे
या करारामुळे कंपनी आणि कामगार यांच्यात अधिक सलोखा, विश्वास आणि विकासाची नवी दिशा निश्चित होईल असा विश्वास आहे.

यावेळी भगीरथ मिलचे मालक माननीय श्री. रमेश जी रांधड व श्री. नवीन रांधड यांच्यासह, भगीरथ कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, कार्याध्यक्ष श्री. मिलिंद देशपांडे आणि श्री. शिशुपाल तुरकर तसेच कामगार पदाधिकारी उपस्थित होते.
या करारामुळे सर्व कामगार बांधवांच्या कल्याणासाठी आणि कंपनीच्या प्रगतीसाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण झाला आहे.
या यशस्वी कराराबद्दल श्री. भगीरथ टेक्स्टाईल मिल व्यवस्थापनाचे आणि कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करन्यात आले