राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी अंतर्गत शहर हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील अनियमितता, निकृष्ट दर्जा तसेच महामार्गालगत झालेल्या अतिक्रमणांबाबत चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना दिले. सदर महामार्गांतर्गत जामखेड -सौताडा रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी महिन्यांचा कालावधी निश्चित असताना देखील गेल्या तीन ते चार वर्षांपासून काम प्रलंबित आहे. जामखेड शहरात महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून इतर ठिकाणी कारवाई करण्यात आलेली असताना जामखेड शहरात प्रभावी कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

रस्त्याच्या कामातील निकृष्ट दर्जा, रस्त्याची असमान रुंदी, जियो-टॅगिंग प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंका, गटारांच्या कामातील त्रुटी या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना निवेदन देण्यात आले. असून बीड रोड परिसरात महावितरणचे विद्युत खांब न हलवता काम करण्यात आल्याने वाहतुकीचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी.

अतिक्रमणे हटवावीत तसेच वाहतूक कोंडीची समस्या तात्काळ सोडवावी, अशी मागणी करण्यात आली आहे या. मागण्यांवर १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास जामखेड तहसील कार्यालयासमोर आपण उपोषण करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.

नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्या नगर
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *