यवतमाळ
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, पाहीजे व फरार आरोपी शोध, अवैध शस्त्र स्वतःचे ताब्यात बाळगून दहशत निर्माण करणा-या इसमांबाबत गोपनिय माहीती काढून कायदेशिर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 18/03/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पोलीस स्टेशन उमरखेड हददीत 17/30 वाजण्याचे सुमारांस पेट्रोलींग करीत असतांना आंबेडकर वार्ड येथील इसम नामे-प्रेम ऊर्फ अविष्कार गायकवाड यांचे जवळ कमरेला मोठ्या आकाराचा लोखंडी धारधार खंजीर असून तो स्टुडन्ट वेल्फेआर इंग्लीश मेडीयम स्कूलच्या समोर दहागाव रोडवर थांबला असून तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दखलपात्र गुन्हा करण्याचे करण्याची शक्यता आहे अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह स्टुडन्ट वेल्फेआर इंग्लीश मेडीयम स्कूल दहागाव येथे रवाना होवून संशयीत इसम नामे प्रेम ऊर्फ अविष्कार गायकवाड यास ताब्यात घेवून पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ कमरेला एक काळया रंगाच्या मुठ असलेला लोखंडी टोकदार धारधार खंजीर किंमत 1200/-रुचा खंजीर स्वतःच्या ताब्यात बाळगुन असतांना मिळून आल्याने तो
जप्त करुन ताब्यात घेवून इसम नामे-प्रेम ऊर्फे अविष्कार जयदेव गायकवाड वय 25 वर्ष, रा. आंबेडकर वार्ड उमरखेड ता.उमरखेड जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
