मोफत हदयरोग रुग्णांची तपासणी शिबिर संपन्न

युथ मोहमेन्ट जमाते इस्लामी हिंद चा उपक्रम

प्रतिनिधी
उमरखेड : युथ मुव्हमेंट महाराष्ट्र तर्फे रमजान ईद निमित्त मोफत हृदय रोग निदान शिबीर घेण्यात आठवडी बाजार सराफ लाईन येथे घेण्यात आले .
या शिबिरात नागपुर चे नामवंत हृदयविकार तज्ञ डॉ. शहीरियार खान ( एमबीबीएस , एमडी ,डी एम कार्डीयोलॉजिस्ट नागपुर)यांनी अत्यंत उत्कृष्ट आणि समर्पित सेवा दिली. या शिबिरात सुमारे 55 हून अधिक रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली. विशेष म्हणजे डॉ . खान यांनी सकाळी अकरा वाजल्यापासून तब्बल 6.30 तास अखंड, न थांबता रुग्णांची तपासणी केली.
प्रत्येक रुग्णाची त्यांनी अत्यंत बारकाईने, संयमाने आणि आपुलकीने तपासणी केली. अनेक रुग्ण गंभीर हृदयविकाराच्या समस्यांनी त्रस्त होते. मात्र डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनामुळे त्यांच्या मनात नवीन आशा निर्माण झाली. हाच खरा मानवतेचा संदेश आणि ईदचा खरा अर्थ आहे.
सर्वात विशेष बाब म्हणजे डॉ. खान ईद निमित्त आपल्या परिवारासाठी वेळ देण्यासाठी आले होते . त्या वेळेतून वेळ वेळ काढून त्यांनी ही सेवा दिली. सुरुवातीला फक्त 2 तासांचा वेळ अपेक्षित होता, मात्र रुग्णांची संख्यापाहून त्यांनी पूर्ण 6.30 तास सेवा दिली. त्यांचा हा सेवाभाव अत्यंत कौतुकास्पद आहे.
शिबिरात आलेले रुग्ण तपासणीनंतर अत्यंत समाधान आणि आनंद व्यक्त करत होते. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हे शिबिर मोठा दिलासा ठरले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी युथ मूव्हमेंटच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. साबीर नाईक, आलम सर, शाहीद खान, आजीम अली, अकरम शेख, मुस्तकीम भाई, माज सोदागर वकार अहमद रेहान खान यांचे विशेष योगदान राहिले.
शेवटी जमाते इसलामी हिन्द चे अध्यक्ष जहीरुद्दीन काजी यांनी
परमेश्वर – अल्लाह त्यांच्या या सेवेला कबूल करो आणि त्यांना या जगात व पारालौकीक जिवना उत्तम मोबदला देओ अशी दुवा केली .मानवता ची सेवा हीच खरी इबादत उपासना आहे हाच ईदचा खरा संदेश या शिबीरातुन देण्यात आला .
मेड लाईफ फार्मा चे वकार अहेमद , नेहाल खान तसेच डॉ खांबाडकर यांचे विशेष सहकार्य या शिबिरास लाभले त्यांचे साबीर नाईक यांनी आभार व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *