फुलचंद भगत
वाशिम:-छेडछाडीची माहिती घरी सांगितली तर आपले शिक्षण बंद होईल, या भीतीने मुली गप्प राहतात. खरे तर छेडछाडीला प्रत्युत्तर दिले तर छेडछाड करणारेच घाबरतात, त्यामुळे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज आहे, अशी भावना मंगरुळपीर येथील गुरुध्वज मिञमंडळाने व्यक्त केली आहे आणी या पार्श्वभुमीवर शनिमंदिर परिसरात दररोज मुलींना लाठीकाठी,मैदानी खेळ यासोबतच स्वरंक्षणाचे अविरत धडे देणे सुरु आहे.
मुली व महिलांवर वाढत चाललेल्या अन्याय-अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त करून गुरुध्वज मिञ मंडळाने मुलींना आत्मसंरक्षण शिकविण्यासाठी पुढाकार घेण्याचे या वेळी ठरविण्यात आले. ग्रामीण व शहरी मुलींची मानसिकता, अपत्य म्हणून मुलगाच हवा म्हणून वाढत चाललेल्या स्त्री भ्रुण हत्या आदींवर तज्ज्ञांची व्याख्याने झाली. मुलींनी विविध क्षेत्रात मिळवलेले उत्तुंग यश समाजासमोर प्रभावीपणे मांडण्य़ाची गरजही व्यक्त झाली. मुली व महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार प्रत्येक घरातील मुलांवर होण्याची आवश्यकताही मांडली गेली.तसेच मुलींना आत्मरक्षणासाठी लाठीकाठी,मैदानी खेळ असे दररोज शिकवण्यासाठी वर्ग सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *