जाफराबाद प्रतिनिधी | दिनांक 4/4/ 2026

जालना: जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानरुपी दुसरे पुष्प गुंफण्यात आले. महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुलजी म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाचे प्रो. डॉ.सुनील मेढे यांचे व्याख्यान आयोजित करून दुसरे पुष्प गुंफले , या वेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख वक्ते प्रो. डॉ.सुनील मेढे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द प्रॉब्लेम ऑफ रुपीज इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा प्रबंध 1921 मध्ये डी एस्सी पदवी संपादन करण्यासाठी लंडन स्कूल ऑफ कोलंबिया युनिव्हर्सिटी येथे सादर केला होता त्यावेळी प्रबंधाचे मूल्यमापन आणि परीक्षण हेरोल्ड लास्की यांच्यासह पाच नामवंत अर्थशास्त्रज्ञांनी मूल्यमापन केले व काही सूचना दिल्या त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांच्या सूचनेच्या अनुषंगाने थोडी भाषा बदल करून तो प्रबंध पुन्हा सादर केला त्यावेळी बाबासाहेबांचे वय अवघे 32 वर्षे होते यावरून असे जाणवते की अगदी कमी वयातही बाबासाहेबांचे अर्थशास्त्र विषयावर कसे प्रभुत्व होते हे सिद्ध होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एम.ए.पदवीसाठी ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा विषय निवडला तर पीएचडी साठी नॅशनल डिव्हीडंट ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अन्यालिटीकल स्टडी हा विषय निवडला होता जून 1921 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पीएचडी पदवी बहाल करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चार प्रबंध लिहिले परंतु प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध जास्त वादग्रस्त ठरला कारण या प्रबंधामध्ये मोघलांच्या काळापासून ते ब्रिटिशांच्या काळापर्यंत कोणते चलन कसे वापरले याचा उहापोह केला आहे भारतीय रुपयात बदलाच्या वेळी काय प्रयोजन होते व काय परिणाम झाले याचेही विश्लेषण करण्यात आले आहे. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुलजी म्हस्के यांनी भारतीय रुपया आणि विदेशी चलन याची तुलना केली तसेच आज जागतिक बाजारपेठेमध्ये अमेरिकन डॉलरची कशी मक्तेदारी आहे व का आहे? याचे सविस्तर विवेचन केले.

भविष्यात भारताने पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून परकीय चलन आपल्या देशात जास्तीत जास्त कसे येईल अशा धोरणाचा स्वीकार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.एम.पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.ए.आर. ढवळे यांनी मानले या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा अनिल वैद्य यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


प्रतिनिधी राहुल गवई, जाफराबाद, जालना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *