
जाफराबाद प्रतिनिधी
जालना: दि.३०/३/२०२६ रोजी वकील संघाची निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी अँड. विनोद डिगे व अँड.शरद पाटील वाकडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.
अटीतटीच्या लढतीत अँड. विनोद डिगे हे दुसऱ्यांदा निवडून आले उपाध्यक्ष पदासाठी अँड. संदीप सोनोने व अँड माया दांडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतू अँड. माया दांडगे यांनी अर्ज मागे घेतल्याने अँड. संदीप सोनोने यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली सचिव पदी अँड.अनता शिराळकर यांची निवड करण्यात आली व सहसचिव म्हणून अँड.माया दांडगे यांची निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड.किशोर गायकवाड, अँड.विकास जाधव, अँड.शिवम खंडेलवाल यांनी नियोजन करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पाडली निवडणुकीत निवडून येणाऱ्या पदाधिकारी यांचा सर्व सन्माननीय सदस्यांनी सत्कार केला
प्रतिनिधी राहुल गवई, जाफराबाद, जालना.
