फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर शहरातील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्याचा आगळ्या वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. नविन सोनखास मंगरूळपीर येथील स्वामी विवेकानंद इंग्लीश स्कुलमध्ये ईयत्ता पहिली मध्ये शिकणारा विद्यार्थी अर्णव गणेश रासकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संविधानाची उद्देशिका प्रत देवुन व उद्देशिकेचे वाचन करून साजरा करण्यात आला. वाढदिवस कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका निलीमा मुंढरे, सारिका नाकाडे,तेजस्वी इंगळे, प्रियंका डुबुले, वैशाली खिराडे, छाया गावंडे,मुटगुळे,संगत ताई तसेच विद्यार्थ्याचे पालक व शाळेत इतर विद्यार्थी व बार्टीच्या मंगरूळपीर तालुका समतादुत श्वेता राऊत उपस्थित होत्या.
