उमरखेड :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संविधानिक युवा फाउंडेशनच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी आमदार किसनराव वानखेडे, नगराध्यक्षा तेजश्री जैन ,माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार नामदेव ससाने, माजी आमदार विजय खडसे , भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा , भाजपाचे शहर अध्यक्ष अतुल खंदारे , ॲड संतोष जैन , पत्रकार राजु गायकवाड , शैलश ताजवे यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले व आयोजकांचे मनोबल वाढवले.
या रक्तदान शिबिरासाठी नांदेड येथील श्री हुजूर साहेब ब्लड सेंटर यांनी रक्त संकलनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. सकाळपासूनच युवक-युवतींसह विविध घटकांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. दुपारपर्यंत एकूण ९२ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संविधानिक युवा फाउंडेशनचे मार्गदर्शक कृष्णा लाबंटिळे, अध्यक्ष सुनिल भांडवले, उपाध्यक्ष शैलेश लांबटिळे, सचिव प्रशांत सुर्यवंशी तसेच सदस्य आकाश लाबंटिळे, अमित भांडवले, कैन्हय्या खंदारे, विक्की काळे, ओंकार सुर्यवंशी, अनुराग जोगदंड आणि जालिंदर गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जयंती साजरी करण्याचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला. अशा उपक्रमांमुळे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती वाढत असून, गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मोठी मदत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
