फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे दिनांक 15/05/2026 रोजी फिर्यादी नामे भगवान चांगदेव वानखडे
यांनी फिर्याद दिली की, पंचायत समिती वाशिम येथे पिटीओ (पँनल टेक्निकल ऑफिसर) या पदावर फिर्यादीचा
मुलगा यास नोकरी लावुन देतो असे सांगुन फिर्यादीकडुन वेळोवेळी 1,73,000/- रुपये घेतले. व कारंजा पंचायत समिती येथील बनावट नियुक्ती पत्र देवुन फिर्यादीची फसवणुक केली वरुन आरोपी नामे रमेश रामकृष्ण नवघरे वय 47 वर्ष रा. पारडी आसरा ता. जि. वाशिम याचे विरुध्द पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे अपराध क्रमांक
५५५/२०२६ कलम ३१८(४), ३३६ (३) (४), ३४०, ३४०(२), ३४१ (१) (२),339, ३३८ भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर गुन्हा नोंद होताच स्थानिक गुन्हे शाखा वाशिम चे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी सपोनि/जगदिश बांगर, पोउपनि/ निलेश जाधव यांचे सह टिम तयार केली व मार्गदर्शन करुन गुन्ह्यात फरार आरोपीचा शोध घेणे करीता रवाना करण्यात आले. सदर आरोपी हा वाशिम मध्ये आल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरुन
त्वरीत स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या टिम ने त्यास पवन हाँटेल वाशिम येथुन ताब्यात घेतले. सदर आरोपीयास
गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोउपनि/ निलेश जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम करीत
आहे.पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी पोलीस दलातर्फे जाहीर आवाहन केली की,अधिकृत संकेतस्थळांचा वापर करा – नोकरी संदर्भातील कोणतीही माहिती केवळ संबंधित विभागाच्या अधिकृत (Official Website) संकेतस्थळावरूनच तपासून घ्या. आर्थिक व्यवहार टाळा. नोकरीच्या नावाखाली कोणीही पैशांची मागणी केल्यास तातडीने सावध
व्हा आणि कोणताही आर्थिक व्यवहार करू नका व तात्काळ पोलीसांशी संपर्क करा.जर आपली किंवा आपल्या परिचयातील कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, किंवा कोणी
नोकरीचे आमिष दाखवून पैशांची मागणी करत असेल, तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क
साधन्यबाबत सुचीत करण्यात आले आहे. आपली माहिती गुप्त ठेवली जाईल.सदर कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस
अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदिप अग्रवाल पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी
स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, सपोनि / जगदिश बांगर, पोउपनि / निलेश जाधव व टिम ने अथक परीश्रम घेतले
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *