फुलचंद भगत
वाशिम:-दिनांक १६ मे रोजी वाशिम शहर वाहतुक शाखेने शहरात दुचाकीला मॉडिफाय सायलन्सर लावुन कर्कश आवाज काढणा-या व ध्वनी प्रदुषण करणा-या दुचाकीवर वाहतुक
शाखेने धडक कारवाई केली या विशेष मोहीमेव्दारे १० चारचाकी तसेच अवजड वाहन कर्कश हॉर्न वाजविणा-या वाहनधारका विरूध्द कारवाई करण्यात आली आहे. सदर मोहीम ही यापुढे
देखील वेळोवेळी राबविण्यात येणार आहे.नागरीकांना अशा पध्दतीने वाहनधारक कर्ण कर्कश हॉर्नचा वापर करत असल्याचे दिसल्यास शहर वाहतुक शाखा वाशिम यांच्याशी संपर्क करावे असे आवाहन वाहतुक विभागा
मार्फत करण्यात आले आहे.

सदरची कारवाई निकेश खाटमोडे पोलीस अधिक्षक वाशिम यांचे
मार्गदर्शनात शहर वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब किसनराव नाईक यांचे टिम पोलीस अंमलदार सुनिल वाणी, दिपक मुळे, विष्णु साबळे, राहुल गवई, शिवकुमार
घुगे, प्रविण जाधव, मनिषा चौके, ज्योती इंगोले, शालु इंगळे यांनी केली आहे.
