८ दुचाकी आणि १ ॲपे वाहन जप्त

३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

तीन संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई

फुलचंद भगत
वाशिम:-कारंजा शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत चोरीच्या संशयावरून ८ दुचाकी आणि १ ॲपे वाहन जप्त केले. राहुल सोळंके, करण चव्हाण आणि चेतन पवार यांच्याकडून ही वाहने ताब्यात घेण्यात आली.पोलिस चौकशीत वाहनांची कागदपत्रे व मालकी सिद्ध न झाल्याने महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२४ अंतर्गत कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासात काही वाहने अमरावतीतील गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.या कारवाईत हिरो होंडा स्प्लेंडर, पॅशन प्रो, होंडा युनिकॉर्न, सीबी शाईन आदी वाहनांचा समावेश आहे.पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पवार, पोलीस हवालदार गणेश जाधव, मयुरेश तिवारी, अजय धनकर, उमेशकुमार बिबेकर तसेच पोलीस कर्मचारी नितीन पाटील, अनिस निमसुरवाले, अमित भगत आणि मोहम्मद परसुवाले यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *