धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांनी महिला बचत गटाच्या महिलांसह आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
धुळे ग्रामीण विकास यंत्रणेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची आंदोलकांची मागणी आहे. १५ ऑगस्टला सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता. आज पालकमंत्र्यांच्या ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी बापू बागुल यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले. कथित गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीवर आंदोलक ठाम आहेत.
