• चौगाव शिवारात बनावट दारू कारखान्यावर छापा
  • LCB पथकाने मिनी कारखाना केला उद्ध्वस्त
  • रसायनांसह बनावट लेबल आणि बाटल्या जप्त
  • इलेक्ट्रिक मशीनसह ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त
  • विशाल गोन्हेकरविरोधात गुन्हा दाखल
  • ज्ञानेश्वर वारे यांच्या पथकाची दमदार कारवाई

DHULE | धुळे तालुक्यातील चौगाव शिवारात सुरू असलेल्या बनावट दारूच्या मिनी कारखान्यावर LCBने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. साल्या माल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतातील कांद्याच्या चाळीत सुरू असलेल्या या कारखान्यातून रसायनांसह बनावट लेबल, काचेच्या बाटल्या आणि इलेक्ट्रिक मशीन असा ४४ हजार ७८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चौगाव शिवारात बनावट दारू बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती LCBचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले.

साल्या माल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतातील कांद्याच्या चाळीत एका खोलीवर पथकाने छापा टाकला. यावेळी बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन, इलेक्ट्रिक मशीन, ब्रँडेड कंपनीच्या नावाचे बनावट लेबल आणि काचेच्या बाटल्या असा एकूण ४४ हजार ७८१ रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.

या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीष भदाणे यांच्या फिर्यादीवरून विशाल दगडू गोन्हेकर (गवळी), रा. धुळे याच्याविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई एसपी विशाल आनंद आणि एएसपी अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBने केली. PSI अमित माळी, शिरीष भदाणे, संतोष हिरे, हेमंत बोरसे, चेतन बोरसे, प्रशांत चौधरी, कमलेश सूर्यवंशी, हर्षल चौधरी, राहुल गिरी, विनय खैरनार, अमोल पाटील आणि हेमंत मिस्तरी यांनी कारवाईत सहभाग घेतला.

प्रतिनिधी | एनटीव्ही न्यूज मराठी | दोंडाईचा, धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *