एकीकडे धुळे शहरात पाणीटंचाईचे संकट असताना, दुसरीकडे हजारो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी रोडजवळ मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने पाण्याचे अक्षरशः फवारे उडत आहेत.

मधुबापू जलकुंभापासून चाळीसगाव रोड जलकुंभाकडे जाणाऱ्या या जलवाहिनीला यापूर्वीही गळती लागली होती. तक्रारीनंतर तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा त्याच ठिकाणी गळती सुरू झाली आहे.

या गळतीमुळे पुढील जलकुंभांमध्ये पाण्याचा पुरेसा दाब पोहोचत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, जलवाहिनी जाणूनबुजून फोडली जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाकडून करण्यात आला आहे. मनपा प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाने तातडीने गळती दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *