दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे आणि गोपनीय विभागाचे पोलीस अविनाश पाटील यांना राज्यस्तरीय सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन, धुळे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव पुरस्कार २०२६ वितरण सोहळा रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या साहित्य, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या सोहळ्यात दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे व गोपनीय विभागाचे पोलीस अविनाश पाटील यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

पुरस्काराचे वितरण कर्नल सुदीप मिश्रा व श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस. टी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *