मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीने लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना ‘लातूर भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
दयानंद सभागृहात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच समाजाभिमुख पोलीसिंगसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे अमोल तांबे यांना हा सन्मान देण्यात आला. यावेळी बोलताना अमोल तांबे म्हणाले, “हा पुरस्कार माझा नसून लातूर पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी-अंमलदाराचा आहे.”
