घर घेऊन देण्याच्या नावाखाली ६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जामीन फेटाळल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलं आहे. संकेत राजेंद्र भोसले याला तपोवन रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आलं.
बालिकाश्रम रोड, सुडके मळा येथील राजेश्वर मनोहर भोसले यांना घर घेऊन देतो, असं सांगून संकेत भोसले याने ऑनलाइन आणि रोख स्वरूपात ६ लाख ५० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र पैसे घेतल्यानंतर घर दिलं नाही किंवा रक्कम परत केली नाही. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र जामीन नामंजूर झाल्यानंतर तो फरार झाला. स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे १३ ऑगस्ट रोजी तपोवन रोडवरील मिस्तबाग/हिस्तबाग महाल परिसरातून आरोपीला ताब्यात घेत तोफखाना पोलिसांच्या हवाली केलं.
प्रतिनिधी | रजत दायमा | अहिल्यानगर
