यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत ७ हजार ८७३ रक्तनमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी १० रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सर्व रुग्णांवर तातडीने उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तन्वीर शेख यांनी दिली. रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये विशेष मोहीम राबवून आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, एएनएम आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी घरोगरी सर्वेक्षण करत आहेत. तापग्रस्त नागरिकांची तपासणी, संशयित रुग्णांची नोंद आणि प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.

ग्रामपंचायतींच्या माध्यमातून संध्याकाळी फॉगिंगद्वारे धूर फवारणी करून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. मे महिन्यापासून सुरू असलेल्या मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून नागरिकांनी घाबरून न जाता वेळेवर आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. तन्वीर शेख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *