यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत नगरपरिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या अनिया अफरीन आणि हलीमा बी यांनी बॅडमिंटनमध्ये यश मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल आमदार किसनराव वानखेडे यांनी दोन्ही विद्यार्थिनींचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उमरखेड येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात नगर परिषद उमरखेड यांच्या वतीने तालुकास्तरीय शालेय क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत नगरपरिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा, डॉ. इकबाल नगरपरिषद येथील विद्यार्थिनी अनिया अफरीन मो. इर्शाद आणि हलीमा बी. अकबर खान यांनी बॅडमिंटनमध्ये तालुकास्तरावर विजय मिळवून स्वतःसह शाळेचे नाव उंचावले.
या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक तथा मार्गदर्शक जुबेर खान, वर्गशिक्षक इकराम उल्ला खान, मुख्याध्यापक रहात अंसारी आणि पालकवर्गाला देण्यात आले.
उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनरावजी वानखेडे यांनी दोन्ही विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थिनींनी सामना जिंकावा यासाठी शिक्षक जुबेर खान यांनी अहोरात्र मेहनत घेतली. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल पालकवर्गानेही शिक्षकांचे कौतुक केले.
