भीषण वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, वारंवार होणारे अपघात, अपुऱ्या पायाभूत सुविधा, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नांवर नागरिकांनी आवाज उठवला.

विशेष म्हणजे, या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोठा वाटा असलेल्या हिंजवडीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, येथील प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

दररोज लाखो कर्मचारी ये-जा करणाऱ्या हिंजवडीत मूलभूत सुविधांसाठीच आंदोलन करण्याची वेळ आल्याने, हा प्रश्न केवळ स्थानिकांचा नसून राज्याच्या आयटी आणि औद्योगिक विकासाशी संबंधित असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *