गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणेकर आक्रमक झाले आहेत. बालगंधर्व चौकात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले असून, “डीजे बंद झालाच पाहिजे” अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
ध्वनीप्रदूषणावर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी करत नागरिकांचा मोर्चा पुणे महानगरपालिकेकडे रवाना झाला आहे. “उत्सवाला विरोध नाही, मात्र ध्वनीप्रदूषणाला विरोध आहे,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
सर्व धर्मांच्या उत्सवांमध्ये कर्णकर्कश डीजे टाळावा आणि विद्यमान ध्वनीनियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, डीजेविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. बापट यांच्यावर नुकताच हल्ला झाल्यानंतर डीजेमुक्त गणेशोत्सवाची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
