चालक दिनानिमित्त १७ सप्टेंबर २०२६ रोजी मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालक बांधवांना शुभेच्छा देत रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा नियमित वापर करावा, वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

रस्ता अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचे महत्त्व पटवून देत चालकांना हेल्मेटचे वाटपही करण्यात आले.

या उपक्रमातून रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *